जवळा परिसरात कमी व्होल्टेजमुळे नागरिक हैराण 44 अंश तापमानातही वीजपुरवठा विस्कळीत; शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांचे हाल

 जवळा परिसरात कमी व्होल्टेजमुळे नागरिक हैराण

44 अंश तापमानातही वीजपुरवठा विस्कळीत; शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांचे हाल


आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 


जवळा व परिसरात सध्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तब्बल 44 अंश तापमान असताना कमी व्होल्टेज व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


जवळा येथे 132 केव्ही व 11 केव्ही अशी दोन्ही विद्युत केंद्रे कार्यरत असतानाही कमी व्होल्टेजची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे घरातील पंखे, कूलर, टीव्ही तसेच पाण्याच्या मोटारी व्यवस्थित चालत नसल्याने नागरिकांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.


दरम्यान, शेतकरी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. कमी व्होल्टेजमुळे ओलीतासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी सुरू होत नसल्याने स्प्रिंकलर प्रणाली ठप्प पडली आहे. परिणामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


याशिवाय, या उकाड्यात वयोवृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, तसेच गर्भवती महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने उपचार, विश्रांती व दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.


सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा महत्त्वाचा कालावधी सुरू असून वीजपुरवठा खंडित होत असल्याने अभ्यासात अडथळे येत आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


गावात सब-इंजिनियरचे कार्यालय व कर्मचारी उपलब्ध असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...