यवतमाळ नगरपरिषदेतर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन  १४ ते २० एप्रिलदरम्यान जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम

 यवतमाळ नगरपरिषदेतर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

 १४ ते २० एप्रिलदरम्यान जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम




 अग्निशमन व आणीबाणी सेवा विभाग, नगरपरिषद यवतमाळ यांच्या वतीने दि. १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निशमन सेवेत कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह दरवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो.



गृह मंत्रालयाने दिलेले घोषवाक्य “सुरक्षित शाळा सुरक्षित रुग्णालय आणि अग्नी सुरक्षिततेसाठी जागरूक समाज आग प्रतिबंधकतेसाठी एकत्रपणे” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.राष्ट्रीय अग्निशमन दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन विषयक माहितीपर कार्यक्रम व प्रात्यक्षिके आयोजित केली जाणार आहेत. तसेच विविध शासकीय व खाजगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे.



या उपक्रमांचे आयोजन नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी अशोक उईके, उपाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तसेच मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. अग्निशमन अधिकारी विनोद खरात व अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातील सर्व कर्मचारी या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यरत राहणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...