आई वडिलांची सेवा करणाऱ्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही.
*- आ.संतोष बांगर*
युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे.श्री.संतोषदादा बांगर
आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे कांडली येथे हनुमान मंदिर कलशारोहन सोहळ्यानिमित्त ह.भ.प.श्री सोपान महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले*.
यावेळी *बोलताना आमदार बांगर म्हणाले की सर्वांनी आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करावी म्हणजे आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही तसेच कुणीही कसल्याही प्रकारचे व्यसन करू नये कारण व्यसन एक जण करते पण त्याची किंमत संपूर्ण कुटुंब चुकवत असते त्यामुळे सर्वांनी व्यसनापासून दूर रहा असे आवाहन आ.बांगर यांनी यांनी उपस्थित भाविकांना यावेळी केले*
यावेळी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,माजी जि. प.उपाध्यक्ष राजेश्वर राव पतंगे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,ऍड संतोष राठोड,विजय पाटील बोंढारे, पिंटू पतंगे वडगावकर,पप्पू भाऊ अडकीने,दत्ता बोंढारे ,पप्पू वीर,सचिन पेंढारकर व समस्त कांडलीवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा