ब्राह्मणवाडा व ब्राह्मणवाडा तांडा येथे विजेचा कडकडात वादळी वाऱ्याने टिनाची छपरे उडून झाले मोठे नुकसान..


भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा:



 दि.25/मे/2022रोजी झालेल्या वादळी वारा पावसामुळे आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथे ब्राह्मणवाडा सर्कल मधील झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील छपरे, टिने उडून गेली. त्यामुळे ब्राह्मणवाडा तांडा गावाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादली वाऱ्यामुळे  विजेच्या तारा खाली पडून लाईन खंडित झाली. मोठ्या प्रमाणात तारा तुटून त्यावर झाडे कोसळली आहे. व टिनाच्या पत्र्याने ब्राह्मणवाडा येथील दोन ते तीन गाईचे घरावरील टिन उडाल्यामुळे त्यांच्या पायाला मोठी जखम झालेली आहे . पण कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील पंचनामा करून येथील तांडा वस्ती ना शासनाकडून नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...