महाराजस्व अभियान शिबिराला जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

**
आर्णी तालुक्यातील केळझरा को. येथे दि.12 जुलै 2022रोजी संपन्न झालेल्या महाराजस्व अभियान शिबिरामध्ये जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या हस्ते नागरिकांना शिक्षापत्रिका वाटप, संजय गांधी अपंग निराधार लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत नागरिकांना लाभ, तसेच प्रलंबित अर्थसहाय्य योजनेचे वाटपचे आदेश देण्यात आले. शेतकऱ्यांना पीक पाहणी डिजिटल सातबारा व इतर बाबी बाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला या योजनेमध्ये उपलब्ध करून दिले जातात तसेच मागील सतत सुरू असलेल्या पावसामुळे हा अभियान होणार नाही अशे नागरिक बोलत होते परंतु जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून या अभीयानांतर्गत आपली कामे पूर्ण करण्यात येईल अशी आश्वासन दिले. या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत सरपंच रमेश चव्हाण तलाठी वाकेकर,मंडाळे, सकवान मंडळ अधिकारी मस्के मुख्याध्यापक स्मिता कोटृऻवार,ग्रामसेवक भ्रदार यांनी परिश्रम घेतले. नागरिकांकरीता तहसील विभागाकडून पुरवठा विभाग, सेतू सुविधा केंद्र, आधार केंद्र, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार तसेच आरोग्य विभागाकडून रक्त तपासणी, पुरुष तपासणी, स्त्री तपासणी औषधी वितरण कक्ष, असे नियोजन करण्यात आले होते. मा.जिल्हाधिकारी महोदयांचे स्वागत सरपंच रमेश चव्हाण यांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित तहसीलदार भोसले नायब तहसीलदार कडासने, तुंडलवार, पुरवठा निरीक्षक राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे मंडळ अधिकारी मस्के, तलाठी मंडळे सकवान, वाकेकर, खैरे उपसरपंच सुनंदा राठोड पोलीस पाटील वैभव कोठावार ग्रामसेवक भ्रतार व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...