महत्वाची बातमी: जि. प. गट व पं.स. गणांच्या आरक्षण सोडतीला स्थगिती

भगीरथ राजा 24 न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सुप्रीम कोर्टातील निकालाने संभ्रमाचे वातावरण असतांनाच आता जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या आज होणाऱ्या आरक्षण सोडतील राज्य निवडणूक आयोगाने स्थागिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 13 जुलै 2022 रोजी आरक्षण सोडत निघणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. तथापि आजच (12/07/2022) रोजी
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट निकाल देणे टाळतांना याबाबत 19 जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. तर राज्यातील निवडणुकांची जिथे प्रक्रिया सुरू झाली नसेल ते थांबविण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांचे 13 जुलै रोजी निघणाऱ्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. यात 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समिच्यांमधील आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे अध्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली जाणार असल्याचेही यातून अधोरेखित झाले आहे. तर, यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण असेल हे देखील दिसून आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...