समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे बालकांचे अधिकार व गुड टच बॅड टच व चाइल्ड हेल्पलाइन संदर्भात घेण्यात आली दोन दिवसीय कार्यशाळा

समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे बालकांचे अधिकार व गुड टच बॅड टच व चाइल्ड हेल्पलाइन संदर्भात घेण्यात आली दोन दिवसीय कार्यशाळा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वडगाव व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा वडगाव येथे समुदाय क्षेत्रकार्य अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ येथील एम एस डब्ल्यू भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 12.10.2022 व 13.10.2022 रोजी बालकांचे अधिकार, चाईल्ड लाईन 1098, गुड टच बॅड टच संदर्भात मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले दिलीप दाभाळेकर,रक्षंदा जंगले,मनीष शेळके ग्रामीण मुक्ती समस्यांची ट्रस्ट यवतमाळ हे होते तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा वडगाव येथील प्रभारी मुख्याध्यापक गिरोळकर मॅडम होते. प्रमुख अतिथी म्हणून उर्दू शाळाचे मुख्याध्यापक सय्यद मुजाहिद सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा मुख्य हेतू रस्त्यावर एकटे राहणारी मुले आणि तरुण असंघटित आणि संघटित क्षेत्रात काम करणारे बालकामगार,घरगुती मदत, विशेषत: मुली घरकाम, कौटुंबिक, शाळा किंवा संस्थांमध्ये शारीरिक/लैंगिक/भावनिक शोषणामुळे प्रभावित झालेली मुले ज्या मुलांना भावनिक आधार आणि मार्गदर्शनाची गरज असते,व्यावसायिक लैंगिक कामगारांची मुले,देह व्यापाराला बळी पडणारी मुले,मुलांच्या तस्करीचे बळी,पालकांनी किंवा पालकांनी सोडलेली मुले हरवलेली मुले,मुले पळून जानारे मादक पदार्थांच्या गैरवापराला बळी पडलेली मुले,भिन्न-अपंग मुले,कायद्याच्या विरोधातील मुले,संस्थांमध्ये मुले,मतिमंद मुले,एचआयव्ही/एड्स बाधित मुले,संघर्ष आणि आपत्तीमुळे प्रभावित मुले,बाल राजकीय निर्वासित,ज्या मुलांची कुटुंबे संकटात आहेत या सर्वांपर्यंत सदर माहिती पोहचावी प्रत्येक गुरजू व्यक्तींन पर्यंत सदर कार्यक्रमाची माहिती पोहचावी,महत्त्व समजावे यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आला
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्ष यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ येथील प्राचार्य डॉ. सुनील वाशिमकर,.सहा.प्रा.डॉ. देविदास शंभरकर,सहा.प्रा.डॉ. सिद्धार्थ गंगाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा.श्री देवेंद्र राजूरकर सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित शिरभाते मॅडम दातारकर मॅडम, पाकधने मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी योगेश तडसे पूजा भुजाडे यांनी उत्कृष्टरित्या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मलकापुरे यांनी केले तथा आभार प्रदर्शन धनश्री चौरागडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...