लोणी येथील आश्रम शाळेत गांधी जयंती

चरख्यावर सुत कातुन विद्यार्थ्यांना पटविली चरख्याची ओळख ! अपर्णा नंदापुरे यांनी सांगितली खादीची महती
आर्णी तालुक्यातील लोणी येथील राष्ट्रीय.आश्रम शाळेत महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चरख्यावर सुत कातुन विद्यार्थ्यांना चरख्याची ओळख पटवून सांगितली. चरख्यावर सुत कसे तयार करायचे आणि त्यापासून खादीचे कपडे कसे तयार होतात ,महात्मा गांधीजी कसे प्रकारे सुत कातायचे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या अपर्णा नंदापुरे यांनी चरखा विषयी विस्तृत माहिती आणि खादीची महती विद्यार्थ्यांना पटवून सांगितली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी चरख्यावर सुत कातायला मिळाल्याचा आनंद घेतला.
महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोणी येथील जि प विद्यालय लोणी सेवानिवृत्त प्राचार्य जेष्ठ साहित्यीक द.तु नंदापुरे सर उपस्थित होते व त्याचप्रमाणे त्यांच्या सुकन्या अपर्णाताई नंदापुरे हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. शाळेचे प्राचार्य विनोद भगत सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश राठोड अधिक्षक अनंत कडव सर मंचावर उपस्थित होते यावेळी प्राथमिक,
माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सुभाष कुंबलवाड, रुपेश रत्ने ,वाल्मिकी शेडमाके, प्रतिभा जिपकाटे, अभिजीत कलोरे, रमेश मुनेश्वर, सुनिल जाधव, वैजनाथ जाधव, श्रीरसागर बुटले, एकनाथ मडावी, सचिन राठोड, अविन खोडे, नितीन गावंडे ,नयन खोडे सौ.खंडारे मॅडम , लिपिक जगदीश होले, विजय ग्रेसपुंजे, रवी भस्मे,ओंकार पवार आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (श.प्र )

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...