ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेची जय्यत तयारी

जवळा: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे निरीक्षक या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी यवतमाळमध्ये येत असून आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद ,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संबंधाने जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
करणार आहेत त्यानिमित्ताने कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संपर्क कार्यालय ग्रामसेवक कॉलनी दारव्हा येथे आयोजित करण्यात आली यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेची जय्यत तयारी करण्याचे एकमताने ठरले यावेळी जिल्हा , तालुका व शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या या बैठकीस
जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत ,जिल्हा महासचिव डी के दामोधर ,जिल्हा उपाध्यक्ष उकेश्वर मेश्राम, शामराव राठोड, सुभाष सावते, भाऊराव गायकवाड ,ज्येष्ठ सल्लागार अशोक शेंडे , सेवानिवृत्त डीवायएसपी सुखदेव जाधव,जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खाडे ,जिल्हा सचिव पांडुरंग मेश्राम, ज्ञानदीप चोपडे ,नाना शिरसाट ,आयटी प्रमुख नितीन धुळध्वज ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण वानखेडे, डॉक्टर चव्हाण नेर तालुका महासचिव प्रेमदास रामटेके, गारवा तालुका अध्यक्ष बिषर हाफी कुरेशी, आनंद शिरसाट हे उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचन जिल्हा महासचिव डी.के दामोधर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश खाडे व आभार प्रदर्शन पांडुरंग मेश्राम यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...