टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली जवळा नगरी जवळा नगरीत प्रथमच भव्य कार्यक्रम.

*भागवत सप्ताह समाप्ती उस्ताहात साजरी*
*टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली जवळा नगरी*.
*माऊलीच्या दिंडीचे गावात ठिकठिकाणी स्वागत*.
*जवळा गावाला आले पंढरपूरचे स्वरूप*
आर्णी तालुक्यातील जवळा येथे गेल्या सात दिवसांपासून श्री.मुंगसाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे अवचित साधून ह.भ.प. भगवताचाऱ्य मुक्तादिदि पंढरपूरकर यांचे भागवत कथाचे आयोजन करण्यात आले होते या भागवत कथाची समाप्ती 20 तारखेला गावातून भव्य दिंडी काढून करण्यात आली यावेळी गावातील महिलांनी आपआपल्या घरासमोरील परिसर स्वच्छ करून रांगोळी काढल्या होत्या व ठिकठिकाणी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले त्यामुळे जवळा गावाला जणू पंढरपूरचे स्वरूप आले असे जाणवत असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी चर्चा करीत होते.
त्याच प्रमाणे 21 तारखेला ह.भ.प दिगंबर महाराज हीप्पर्गेरकर पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन झाले व मोठ्या प्रमाणात जवळा व परिसरातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प वसंतबाबा महाराज पंढरपूरकर यांची सप्ताह मध्ये उपस्थिती होती तर श्री. मुंगसाजि महाराज संस्थान व तसेच जवळा गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम उस्ताहात पार पाडला. *मंत्री संजय राठोड यांची विशेष उपस्थिती व मंदिर बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन*
जवळा येथे जय मुंगसाजी माऊली संस्थान जवळा येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व गावाच्या विकासा साठी व मंदिर बांधकाम करण्यासाठी निश्चित स्वरूपात मुंगसाजी माऊली धामणगाव येथे ज्या प्रमाणात कामे झाली त्याच प्रमाणे फुल ना फुलाची पाकळी म्हणून जवळा गावातील मुंगसाजी माऊली मंदिरासाठी निधी जेवढा देता येईल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले ह.भ.प.भागवताचार्य मुक्ताश्रीजी दीदी यांच्या अमोघ वाणीतून सुरू असलेल्या या सप्ताहाचे कौतुक केलं. या वेळी राजुदास जाधव, डॉ.विष्णू उकंडे , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, कालिंका ताई पवार, सरपंच प्रणिता ताई आडे, ग्रामपंचायत सदस्य, मुंगसाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर वैद्य, दादाराव शिकारे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
*सात दिवस निःशुल्क योग शिबिर* योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांचे शिष्य जवळा येथील योगगुरू गजानन इरतकर यांनी आपला वेळातला वेळ काढून स्वामी रामदेव बाबा यांचे योग प्रशिक्षण गावातील मुले,मुली व तरुणांना दिले त्याबद्दल त्यांचे सर्व गावकऱ्याकडून स्वागत करण्यात आले श्री.गजानन इरतकर हे योग स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यात प्रथम आले आहे व ते आज आपल्या जवळील योग प्रशिक्षण गावातील व परिसरातील तरुणांना निःशुल्क देत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...