जवळा येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ

जवळा येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
जवळा:- आर्णी तालुक्यातील जवळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजित सप्ताहामध्ये कथा प्रवक्त्या ह.भ.प हरिभक्त भागवताचार्य मुक्ता श्रीजी दीदी पंढरपूरकर यांचा १०१ वा
श्रीमद भगवत कथा,ज्ञानयज्ञ कार्यक्रम जवळा येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ १४ जानेवारीला झाला असून कार्यक्रमाची सांगता २१ जानेवारीला या कार्यक्रमाची सांगता श्री मुंगसाजी माऊली, आप्पा स्वामी माऊली, दत्त माऊली, जगदाळे महाराज आणि बालाजी कृपेने मुंगसाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून हरिभक्त श्री मुक्ता श्रीजी दीदी पंढरपूरकर यांच्या अमृतवाणीतून श्रीमत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या आयोजनात अनेक संत महात्मे व मान्यवर उपस्थित राहणार आहे. कथा प्रवक्त्या ह. भ. प. भागवताचार्य मुक्ता शिर्जी दीदी पंढरपूरकर विशेष उपस्थिती गुरुवर्य ह. भ. प.वसंत बाबा महाराज पंढरपूरकर आणि मुक्ता श्रीजी दीदी यांची चम्मू सिंध वादक व गायक (सदानंद पुरी) तबलावादक व गायक (किशोर अडकिने) ऑक्टोपॅड वादक (नकुल मोरे) गायक व मापनर (राजूभाऊ राठोड) मृदंग वादक (अंकुश पांढरकर) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...