गणेरी येथील मनिषा गेडाम हिचे मुंबई येथे राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत निवड

*गणेरी येथील मनिषा गेडाम हिचे मुंबई येथे राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत निवड*
घाटंजी(प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ औद्योगिक व व्यावसायिक कामगारासाठी 26 वी आणी महिलांसाठी राज्यस्तरीय 21 वी खुली कब्बडी स्पर्धा मुंबई येथे दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२३ ला आयोजित करण्यात आली असताना यवतमाळ जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व आदिवासी ग्रामीण भागातील युवती मनिषा गोविंदा गेडाम हिची महिला कब्बडी स्पर्धेत निवड झाल्या बद्दल सर्व गावकरी व आदिवासी समाज बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे
मनीषा गोविंदा गेडाम हिचे मुळ गाव घाटंजी तालुक्यातील शेवट टोक तेलंगणा सीमेलगत गणेरी गावातील असून प्राथमिक माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळा जांब कारेगाव झाले पदवी व पदवीउत्तर शिक्षण यवतमाळ येथे घेत आहे लहान पणापासून खेळाची आवड असताना आज राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा भाग घेऊ गावाचे नाव उजवल केले अशी भावना गावकरी करत आहे ग्रामीण आदिवासी समाजातील पाहिले मुलगी आहे जिने महिला कब्बडी स्पर्धा भाग घेतला तिला मार्गदर्शक दिनेश ढोके सर व कोमल ढोके मॅडम इंटलिजन बहुउद्देशिय क्रीडा मंडळ व संस्था यवतमाळ शिक्षण प्रसार व इंटेलिजन बहुउद्दशीय संस्था ( IBS Accademy ) यांच्या माध्यमातून कबड्डी व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण दिल्या जाते.
तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मुंबई येथे आयोजित झालेल्या दिनांक २४ जानेवारी २०२३ ते २६ जानेवारी २०२३ पर्यंत कबड्डी स्पर्धा या सामने मध्ये आम्ही सहभाग घेतला व विशेष मार्गदर्शन मिळाले आम्हाला त्या स्पर्धेत खुप काही गोष्टी शिकायला मिळाले व अनुभव सुद्धा आले. म्हणून आम्ही सर आणि मॅडम चे खुप खुप आभार मानते. IBS Accademy चे आभार मानते.यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष मार्गदर्शन व आई वडील यांचे पाठबळामुळे आज मुंबई मध्ये जाऊन खेळण्याची संधी मिळाली अशी भावना मनिषा हिने व्यक्त केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...