कुर्ली येथील जि प शाळेत नागरी सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुर्ली येथील जि प शाळेत नागरी सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ##################
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कुर्ली येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण श्री आकाश आत्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे हस्ते करण्यात आले.हा राष्ट्रीय सण साजरा करण्याकरीता गावातील नागरीक, पालक, नवयुवक,महिलामंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने गावातील दानशुर आणि शाळेला वेळोवेळी मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री जयप्रकाशजी काटपेल्लीवार ( माजी जिल्हा परिषद सदस्य) यांनी भुषविले.पुढील सत्कारमुर्ती यांचा सत्कार करण्यात आला श्री सतिषरेड्डी गड्डमवार सरपंच ग्रामपंचायत कुर्ली, आकाश आत्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,सौ.सविताताई लेनगुरे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मुरलीधर मेहता,अजय पोलकमवार, पार्वती किनाके,सौ.रोहिनी रुद्राक्षवार, राहुल आत्राम, दत्तात्रय उसकेमवार, भगवान रूद्राक्षवार, गुणवंतराव लेनगुरे, गजाननराव चिल्लावार (पत्रकार) कळंबनगरी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आदिवासीनृत्य,बंजारा नृत्य, तेलगु नृत्य, लावणी , देशभक्तीपर गीत या विविध भाषेतील गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाकरीता सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,पालक आणि शेकडो गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन श्री दिपक महाकुलकर पदवीधर शिक्षक यांनी केले.प्रास्ताविक श्री किसनराव किनाके मुख्याध्यापक व आभार प्रदर्शन नितीन मुद्देलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संजय आडे, उमा पंधरे, अजय पोलकमवार, पार्वती किनाके,रोहिणी रुद्राक्षवार सतिका नगराळे, ज्योती याटावार, यमुना मेश्राम,मारोती सोनुले अरुण मेश्राम,देवानंद लोखंडे,सुरेश कुळसंगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...