*राज्यस्तरीय पुरस्काराने परसोडा सरपंच प्रा.सौ.स्वप्ना देशमुख सन्मानित*
◆भाऊसाहेब माने प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कार ◆
आर्णी:भाऊसाहेब माने प्रतिष्ठान द्वारा आयोजित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला ह्यात तालुक्यातील सरपंच प्रा.सौ.स्वप्ना अतुल देशमुख यांना उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना त्यांचे कार्याची पावती म्हणून आणि त्यांचे कार्याचा समाजाला परिचय व्हावा आणि त्यांचे आदर्श समोर ठेवून इतरांनी त्यांचे कार्याची प्रेरणा घेऊन समाजकार्य करून आपला समाज, गाव हे विकसित करावे ह्या प्रमुख उद्देशाने भाऊसाहेब माने प्रतिष्टान मागील २० वर्षांपासून असे कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था ह्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने समान करते.
परसोडा ग्राम पंचायतचा सत्कार आयोजित कार्यक्रमात करण्यात आला ह्यापूर्वी ग्राम पंचायतला राज्य शासनाने विभागीय स्तरावरील वनश्री पुरस्काराने तसेच स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सरपंच ऑफ द इयर तसेच युवा सरपंच अश्या अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आयोजित कार्यक्रमाचे वेळी प्रतिष्ठान चे डॉ. विजय माने,अशोक वानखेडे, एल.के.चिंतले,डॉ.गणेश जाधव यांचे सह अनेक पक्षाचे राजकीय पदाधिकारी,शेतकरी यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
राज्यस्तरीय पुरस्काराने परसोडा सरपंच प्रा.सौ.स्वप्ना देशमुख सन्मानित
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा