घाटंजी येथे बैल बाजार सुरू करावा, शेतकऱ्यांची मागणी*

*घाटंजी येथे बैल बाजार सुरू करावा, शेतकऱ्यांची मागणी*.
घाटंजी (प्रतिनिधी) घाटंजी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. या तालुक्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 70 टक्के आहे. दरवर्षी बैल बाजारात लाखो रूपयांची उलाढाल होते. मात्र जानेवारी महिना उलटूनही कृषी उत्पन्न बाजार समीतीने बैल बाजार भरविण्यासाठी पुढाकार घेतला नाही हे विशेष.! उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार भरविण्यासाठी नकारार्थी भुमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
अनेक शेतकरी या बाजारात लहान गोऱ्हे खरेदी करतात व त्यांचे चांगले पालनपोषण करून दुसऱ्या वर्षी ते विकायला आणतात. पर्यायाने त्यांना दोन पैसे अधिक मिळतात शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात आर्थिक नियोजन होऊन आर्थिक घडी बसविण्यासाठी मदत होते. परंतु कृषी उत्पन्न बाजार समीतीने नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी जनावरांना लंपी आजाराची लागण झाली होती.
आता तो पण आजार नाहीसा झाला आहे. मग नेमक्या कोणत्या कारणाने बैल बाजार बंद ठेवण्यात आला आहे याचे कारण गुलदस्त्यात आहे. एकीकडे कापसाचे भाव खाली आले आहे, अजूनही शेतकऱ्यांचा 80 टक्के कापूस घरी पडून आहे कसे बसे बैल बाजारातून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील अशी अपेक्षा होती मात्र त्यावर सुद्धा पाणी फेरल्या गेले आहे. म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्काळ बैल बाजार सुरू करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...