ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशन चा आवेज चव्हाण राज्यस्तरावर तिसरा

*ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशन चा आवेज चव्हाण राज्यस्तरावर तिसरा*
जवळा: जवळा तालुका आर्णी येथील ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशन च्या वतीने चालविण्यात येणाऱ्या गुरुकुल इंग्लिश स्कूल मधील वर्ग अकरावीचा विद्यार्थी आवेज चव्हाण हा क्रॉस कंट्री मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून सिल्वर मेडल चा विजेता ठरला आहेत.
गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा मधील वर्ग अकरावी ला शिकणारा आवेज चव्हाण यांनी राज्यस्तरावर सहा किलोमीटर क्रॉस कंट्री मध्ये आपले तिसरे क्रमांकाचे स्थान निश्चित केले आहे.याकरता त्याला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्याद्वारे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्रमाणपत्र आणि सिल्वर मेडलदेऊन गौरविण्यात आले आहेत
जवळ्या सारख्या ग्रामीण भागात आपले शिक्षण पूर्ण करणारा आवेज चव्हाण हा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे त्यांनी मिळवलेल्या या यशाकरता सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि विद्यालयाला देतो.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...