विहरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या
# आर्णी तालुक्यातील देवगाव येथील घटना
# मृत्युचे कारण गुलदस्त्यात
जवळा:- आर्णी तालुक्यातील देवगाव येथे शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी रात्री १०: ३० सुमारास संतोष उकंडा जाधव वय वर्ष ३२ रा.देवगाव याने गावातील पाणीपुरवठ्या च्या विहरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.घटनेची तक्रार मय्यताचे चुलत भाऊ किशोर जाधव यांनी आर्णी पोलीस स्टेशन ला दिली असता,दिनांक ४ फेब्रुवारी सकाळी ११:३० वाजता आर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहरीतून बाहेर काढून
घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविण्यात आला.युवकाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असावे हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
पुढील तपास जमादार अरुण चव्हाण व देवानंद मुनेश्वर करित आहे.
विहरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या# आर्णी तालुक्यातील देवगाव येथील घटना
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق