दिवंगत लताताई रामटेके पुरस्कार कवी रमेश पवार यांना जाहीर

दिवंगत लताताई रामटेके पुरस्कार कवी रमेश पवार यांना जाहीर -
12 फेब्रुवारीला होणार पुरस्काराचे वितरण- जवळा ता.आणि जि.यवतमाळ येथील सौ लताताई रामटेके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे पती श्री.नरेशचंद्र रामटेके यांनी प्रायोजित केलेला प्रथम वर्षीचा वाड;मय पुरस्कार अमळनेर जि.धुळे येथील युवा कवी श्री. रमेश पवार यांना जाहीर झाला आहे.5 हजार रुपये रोख,शाल, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो येत्या 12 फेब्रुवारी 2023 रोजी श्री.रमेश पवार यांना समारंभपूर्वक 12 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता प्रदान करण्यात येणार आहे. लॉर्ड बुद्धा कार्यालय,संविधान चौक,यवतमाळ येथे पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध वक्ते व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण सरकटे हे राहणार असून प्रमुख वक्ते व अतिथी म्हणून अनुक्रमे प्राध्यापक घन:श्याम दरणे व श्री.प्रमोद बाविस्कर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुरस्काराच्या मुख्य कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी होणाऱ्या निमंत्रितांच्या गजल मुशायराच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध
कवी,गझलकार विनोद बुरबुरे हे राहणार असून मुशायऱ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी कथाकार गझलकार विनय मिरासे 'अशांत' हे करणार आहेत. यवतमाळ शहर व परिसरातील नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे पुरस्कार समितीचे अध्यक्ष विनय मिरासे 'अशांत' व प्रायोजक श्री.नरेशचंद्र रामटेके यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...