विगर बायोटेक प्रायव्हेट ली. इंदोर, कंपनीकडून पिक पाहणी कार्यक्रम
घाटंजी :-तालुका प्रतिनिधी
घाटंजी तालुक्यातील आकपुरी येथे पिक पाहणी कार्यक्रम घेण्यात आले.
भारतातील बियाणे क्षेत्रातील नामांकित कंपनी विगर बायोटेक प्रा.लि. इंदोर या कंपनीचे एम. डी. श्री विवेकजी कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कंपनी नवनवीन उत्कृष्ट कृषी उत्पादने शेतकऱ्यांच्या सेवेत कंपनी देत आहेत. विगर बायोटेकचे रिसर्च सोयाबीन 'करिष्मा' हे भारतातील सर्वात जास्त उत्पादन देणारे सोयाबीन ठरले आहेत आणि करिष्मा सोयाबीन ला शेतकऱ्यांची पहिली पसंद आहेत आणि या वर्षी कंपनीने रिसर्च चना महाकाल वाण हे शेतकऱ्यांना नव्याने उपलब्ध करुण दिले आहेत.
महाकाल चण्याची वैशिष्ट्य म्हणजे, महाकाल चणावर मर रोगाचा प्रादुर्भाव येत नाही त्यामुळे फवारणीचा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होण्यास उपयुक्त असे वाण आहे. घट्यामध्ये दोन दाण्याचे प्रमाण जास्त राहते. महाकाल चनाचे हि जात यांत्रीक काढणीसाठी उत्तम आहे.
या पिकांचा कालावधी 105 ते 115 दिवस आहे.
श्री घंटावार सर (डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग इंडिया हेड) श्री. कुरळे सर (महाराष्ट्र हेड) याच्या मार्गदशना खाली कंपनी महाराष्ट्र मध्ये कृषी क्षेत्रात कार्य करित असून जास्तीत जास्त शेतकार्यापर्यंत चांगले उत्पादन पोचविण्यासाठी कंपनी काम करीत आहे. कंपनी महाराष्ट्रात उत्तम बियाणे पोहचवण्याचे कार्य करिता आहे. विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कडून कंपनी श्री ओम प्रकाश सितारामजी राऊत यांचा सिल्वर मेडल, शाल श्रीफळ देऊन सत्कार घेण्यात आला त्यांनी आपल्या शेतात विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे महाकाल नावाने असलेला चना आपल्या शेतामध्ये लावला होता हे वाण त्यांच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने आल्यामुळे विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ने त्यांच्या शेतामध्ये पीक पाहणी कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमांमध्ये श्री ओम प्रकाश सितारामजी राऊत यांचा सत्कार करण्यात आले.
यवतमाळ जिल्हा कंपनी प्रतिनिधी श्री प्रविण जाधव यांनी शेतकऱ्यांना आपल्या महाकाल चणा लागवडीबद्दल माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की महाकाल चला ही चण्यामधील उत्तम जात असून त्याला फळ फांद्या जास्त राहतात व झाड हिरवेगार राहते व या महाकाल चण्याच्या जातीमध्ये मरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होते त्यामुळे सर्वांनी हे वाण आपल्या शेतामध्ये लावण्यास हरकत नाही असे ते यावेळी सांगीतले आणि याच कार्यक्रमांमध्ये एकता बहुउद्देशीय पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष कंजूम कुरेशी यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार घेण्यात आला व पत्रकार अरविंद चौधरी व मनोज राऊत हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते यांचा सुद्धा सत्कार यावेळी कंपनी कडून घेण्यात आला पिक पाहणी कार्यक्रमात शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.
विगर बायोटेक प्रायव्हेट ली. इंदोर, कंपनीकडून पिक पाहणी कार्यक्रम
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق