शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचे दत्तरामपुर जवळ चक्काजाम आंदोलन
जवळा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आर्णी तालुक्याच्या वतीने नागपुर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी शहराला लागून असलेल्या दत्तरामपुर गावाजवळ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शासनाने कापसाला १० हजार रुपये हमी भाव जाहीर करून त्वरीत कापसाची खरेदी चालु करावी. सोयाबीनला ७हजार रुपये हमी भाव जाहीर करून खरेदी सुरू करावी. हरभरा व तुरीची नाफेड मार्फत आँनलाईन नोंदणी करून खरेदी त्वरीत सुरू करावी. या मागण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे आर्णी तालुक्याच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे,उपजिल्हा प्रमुख रवि राठोड,तालुका प्रमुख उज्वल मोरे, शहर प्रमुख पंकज शिवरामवार, लक्ष्मण पठाडे, यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आर्णी तालुक्याच्या वतीने नागपुर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी शहराला लागून असलेल्या दत्तरामपुर जवळ चक्का जाम आंदोलन चालू असताना एक किलोमीटर पर्यंत गाड्याच्या रांगा लागल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचे दत्तरामपुर जवळ चक्काजाम आंदोलन
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق