देवस्थान आणि सडकेच्या बाजुच्या झाडा खाली भिक मागुन जगणारी दिग्रसची सखुबाई गायकवाड सडलेला पाय घेवुन उमरीपठार वृध्दाश्रमात दाखल—तिच्या पायाचे आॅपरेशन
जवळा
दिग्रस येथे देवस्थानावर तर कधी सडकेच्या बाजुला असलेल्रा झाडाखाली सडलेला पाय घेवुन येणा-या जाणा-यांना भिक मागुन शरीरात जीव आहे म्हणुन कशी तरी जगत होती.तिच्या विवश आयुष्याची कदर येवुन काही सामाजीक कार्यकर्त्यांनी सखुबाईला ऊमरीपठार वृध्दाश्रमात आणुन सोडले.तिचा सडलेला पाय व त्यातुन रक्त पु वाहत होते.अश्या अवस्थेत ती जरजर झाली होती.वृध्दाश्रमाचे संचालक शेषरावजीडोंगरे आणि त्यांचा मुलगा जयप्रकाश डोंगरे यांनी तिला तात्काळ वसंतराव मेडीकल हाॅस्पिटलला नेवुन भरती केले.जयप्रकाश डोंगरे सतत तिची दवाखाण्यात तिचे जवळ राहून सेवा करीत होते.तिच्या पायाचे आॅपरेशन होवुन सडका भाग काढुन टाकण्यात आला,पंधरा दिवसा नंतर तिला सुट्टी देण्यात आली.तिला चालता येत नसल्याने व्हील चेअरवन फिरवावे लागते.तिच्या पायाची जखमेचे बॅडेज शेषरावजी डोंगरे आणि जयप्रकाश डोंगरे स्वच्छ पाय धुवुन करीत आहेत.एका बेवारस वृध्द जीवाचा सडलेला पाय दुरुस्त व्हावा यासाठी या वृध्दाश्रमात सेवा होत असलेले पाहुन तिच्या मनातील भावना ऊचंबळून काय म्हणत असतील?
देवस्थान आणि सडकेच्या बाजुच्या झाडा खाली भिक मागुन जगणारी दिग्रसची सखुबाई गायकवाड सडलेला पाय घेवुन उमरीपठार वृध्दाश्रमात दाखल—तिच्या पायाचे आॅपरेशन
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق