अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पलटी.
दोघाचा खाली दबून मृत्यू.
आर्णी.
अरूनावती नदीपात्रातून चिकणी कसबा येथील महादेव घाटावरून अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन त्या खाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरूनवती नदीपात्रातून अवैध रित्या रेतीचा उपसा करून सोनालीला कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 बीसी 74 42 हा ट्रॅक्टर संतोष गुलाब मेंढे वय 26 रा.चिकणी कसबा यांनी 15 तारखेला 9 वाजताच्या दरम्यान अवैधरित्या रेती भरून नेत असताना निष्काळजीपनाने सुसाट वेगाने चालवीत ट्रॅक्टरचा मुंडा पलटी झाला असून त्या ट्रॅक्टर खाली कैलास ज्ञानेश्वर पारधी वय 32 वर्ष व रामदास काशीराम भूजाडे वय 32 वर्ष दोन्ही राहणार चिकणी कसबा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांचा ट्रॅक्टरच्या मुंड्याखाली दबून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती आर्णी पोलिसांना पोहोचतात घटनास्थळ गाठून मृतकांना आर्णी येथील ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदनाकरिता पाठविण्यात आले व घटनास्थळाचा पंचनामा करून चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज पवार सह जमादार केंद्रे करीत आहे.
अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पलटी.दोघाचा खाली दबून मृत्यू.
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق