विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
# आर्णी तालुक्यातील लोणी येथील घटना
जवळा:-तालुक्यातील लोणी येथे मंगळवार दिनांक २१ मार्च च्या रात्री १२ वाजता दरम्यान विवाहितेने, पाळण्याच्या दोरीच्या सहाय्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली.पूजा रविंद्र कुरसिंगे वय २७ वर्ष रा.लोणी असे मृतक विवाहितेचे नाव आहे.बुधवार दिनांक २२ मार्च रोजी आर्णी पोलिसांना माहिती मिळताच,घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविण्यात आला होता,मात्र विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत,मृतदेहाची उत्तरीय तपासणी इनकॅमरा व्हावी म्हणून,नंतर मृतदेह आर्णी ग्रामीण रुग्णालय येथून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आला.त्या मृतक महिलेचा मृतदेह सायंकाळी ५ वाजता लोणी येथे आणण्यात आला,त्यानंतर मृतक महिलेच्या माहेर कडील नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा करावी या मागणी साठी अर्धा तास आक्रोश केला.दोन्ही परिवारात वाद निर्माण होईल म्हणून,उपविभागीय पोलीस अधिकारी,ठाणेदार शाम सोनटक्के,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत कालुसे घटनास्थळी दाखल झाले होते.त्या मृतक विवाहितेवर पोलिस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आला.
या घटनेने लोणी गावावर शोककळा पसरली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महेश गणेश कुरसिंगे वय ३६ वर्ष यांच्या फिर्यादिवरून आर्णी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.मृतक महिलेच्या पश्चात ८ महिन्याचा मुलगा व पती आहे.पुढील तपास आर्णी पोलीस करित आहे.
लोणी येथे विवाहीतेची छताला गळफास घेऊन आत्महत्या
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق