कर्मचाऱ्यांची दिवसभर पेन्शन पेन्शन
बळीराजांवर पावसाचे आस्मानी टेन्शन
# कार्यालयात सुकसुकाट,शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
आर्णी:-जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक १४ मार्च पासून संप पुकारला,२००५ पासून महाराष्ट्र शासनाने सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद केले होते अनेक वेळा अनेक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदने आंदोलने केली परंतु जुनी पेन्शन योजना चालू झाली नाही सध्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन चालू आहे या काळात दरम्यान तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील या अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी एकवटले आहेत आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी आज रस्त्यावर उतरले आहेत,त्यामुळे आर्णी शहरातील सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या दिसून येत आहे.कार्यालयात शुकशुकाट असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थाना आल्यापावली च परतावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या तीन दिवसात अवकाळी पाऊस,सुसाटच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात बदल झाल्याने आर्णी तालुक्यातील हरभरा व गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसाचे तुरळक थेंब पडू लागल्याने तोंडाशी आलेला घास वाया जातोय का? अशी भीती आर्णी तालुक्यातील गहू व हरभरा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.आर्णी तालुक्यात हरभर व गहू पिकाच्या कापणीला नुकताच वेग आला होता,पण मात्र हवामानात झालेल्या भीतीपोटी,शेतकऱ्यांमध्ये गहू व हरभरा पिकाच्या कापणी साठी स्पर्धा लागली आहे.सर्व शेतकऱ्यांची कापणीची कामे एकदाच आल्याने मजुराची कमतरता पडत आहे,मात्र काही शेतकऱ्यांची कापणी झालेली असताना, पण काढायला मशीन मिळत नसल्याने,पिक झाकण्यासाठी धावपळ होत आहे.
खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीच्या संकटात हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी तील गहू व हरभरा पिकाची पेरणी केली होती,मात्र दोन दिवसापासून झालेल्या हवामानाच्या बदलामुळे,आर्णी तालुक्यातील शेतकरी पिक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे,हाती आलेले पिक वाया जायची वेळ शेतकऱ्यांवर आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
कर्मचाऱ्यांची दिवसभर पेन्शन पेन्शन,बळीराजांवर पावसाचे आस्मानी टेन्शन
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق