⚡ ब्रेकिंग News

राहुल गांधी च्या समर्थनात महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर

राहुल गांधी च्या समर्थनात महाविकास आघाडी उतरली रस्त्यावर आर्णी येथे महाविकास आघाडी कडून रस्तारोको केंद्रसरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
जवळा:- काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक २६ मार्च रोजी आर्णी शहरानजीक असलेल्या, दत्तरामपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात निषेध नोंदवत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सुरातच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना एका प्रकरणात २ वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर,२४ तासाच्या आत लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.लोकशाही मध्ये विरोधी पक्ष आवश्यक आहे.मात्र मागील नऊ वर्षात मोदींच्या काळात जे जनतेचे प्रश्न घेऊन आवाज उठवितात त्यांना तुरुंगात टाकले जाते आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे नंतर देशातील जनता काँग्रेस मागे उभी राहत आहे.भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे.म्हणून राहुल गांधी यांना कुठेतरी अडकविण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदीसरकार कडून सुरु आहे असे आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने रस्तारोको आंदोलनात करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात "या भाजप सरकारचे करायचे काय,खाली मुंडकं वर पाय" अशी जोरदार घोषणा बाजी करून,रस्त्यावर टायर जाळण्यात आले. व रस्ता रोको करून निषेध करण्यात आला,यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी आमदार ख्वाजा बेग,माजी आमदार बाळासाहेब मुंनगिनवार,शिवसेना जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे, मनिष पाटील,जितेंद्र मोघे साजिद बेग,हरीश कुडे,अनिल आडे,विजय मोघे,आरिज बेग,प्रदिप वानखडे,गणेश हिरोळे,बाळासाहेब शिंदे,सुनील भारती,अनिस टेलर, अतुल देशमुख, राजु बुटले,राजीव विरखडे,विलास अगलदरे,दिनेश पवार, संजय सुखदेवे, राहुल लाभसेटवार,पंडित बुटले,चिराग शहा,अमोल मांगुळकर,निसार भाटी,फयाज सय्यद व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...