⚡ ब्रेकिंग News

राष्ट्रीय क्षय रोग दिनाचे औचित्य साधून जवळा येथे आयोजित करण्यात आले सेवा वितरण शिबिर

*"राष्ट्रीय क्षय रोग दिनाचे औचित्य साधून जवळा येथे आयोजित करण्यात आले सेवा वितरण शिबिर"*
*सर्वसामान्य जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी समाजकार्य विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आले आरोग्य शिबीर
जवळा: महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ तथा ग्रामीण शासकीय रुग्णालय आर्णी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २४.०३.२०२३ वार शुक्रवार ला निःशुल्क आरोग्य शिबीर राबविण्यात आले.समाजकार्याच शिक्षण घेत असलेले बी.एस.डब्ल्यू च्या विद्यार्थीना गटकार्य समुदायकार्य, सेवा वितरण शिबिर यांच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत जवळा यांच्या सहकार्याने एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये टी.बी, एच,आय,व्ही, सिकल सेल्स, बाल आरोग्य तपासणी घेण्यात आल्या एकूण ७१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डॉ.सुनील वाशिमकर यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जवळा सौ.प्रणिता देविदास आडे, प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा.डॉ. राहुल गोंडाणे उपस्थित होते तसेच ग्रामीण शासकीय रुग्णालय आर्णी येथील डॉ. भवरे सर यांच्या नेतृतावात डॉ. सुनील सर समुपदेशक, पुरुषोत्तम गुडे HIV समुपदेशक, डॉ.भास्कर गुघाणे .रविभाऊ इंगळे यांनी सेवा दिली
तसेच जवळा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आशाताई भिसे,रुचिकाताई एकंडवार,हर्षाली चौधरी, सीमा चोपडे, दीक्षा करमणकर, अतिश मुजमुले, धीरज गावंडे, संजय नागापुरे, श्री.नरेश रामटेके, उपस्थिती होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन की.पुनम. पवार हिने मानले संपूर्ण कार्यक्रम पूर्वत्वास नेण्यासाठी धीरज मनवर तेजस्विनी मढवे, पुष्पा पवार, प्रतीक्षा राऊत, शीतल मडावी, अभिषेक ठाकरे, सुखदेव महरनर यांनी अथक परिश्रम घेतले त्याच प्रमाणे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते दैनिक पुण्यनगरी पत्रकार गणेश एकंडवार, दैनिक दिव्य मराठी पत्रकार अमोल टक,देविदास आडे. अंजली इंगळे, पुनम पवार यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...