⚡ ब्रेकिंग News

सृष्टी आदिवासी आश्रम शाळा येथे प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर*

सृष्टी आदिवासी आश्रम शाळा येथे प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर
महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यवतमाळ येथील विद्यार्थ्यांच्या वतीने सृष्टी आदिवासी आश्रम शाळा, मोहा येथे 26 मार्च 2023 रोजी एक दिवशीय मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी व तेथील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून डॉ. विशाल चव्हाण लाभले होते. प्रमुख उपस्थिती आणि कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. अमृता हिरावार (अध्यक्ष) रोटरी इनर व्हील क्लब, यवतमाळ यांनी केले , सोबतच यांच्याकडून मोफत औषध वाटप करण्यात आले.
शिबिराचे प्रमुख पाहुणे सहा. प्रा. डॉ. तक्षशिला मोटघरे, सहा. प्रा. डॉ. विनोदकुमार चोपकर, सहा. प्रा. वसंता वंजारी, पवन डोंगरे (विद्यार्थी प्रतिनिधी प्रमुख), पियुष ढाले (विद्यार्थी प्रतिनिधी उपाध्यक्ष) यांनी आपली उपस्थिती दर्शवली. शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. एस.एम.निळ यांनी स्वीकारले होते. यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. या शिबिराचे आयोजन सहा. प्रा. डॉ. तक्षशिला मोडघरे प्रा. डॉ. विनोदकुमार चोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली कु. शितल भुरके, पल्लवी भरबडे, मनीष माकोडे व ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन कु. शितल भुरके यांनी केले.
कार्यक्रमाकरिता कुणाल कोवे, कुणाल कुडमते, आशिष वाघमारे, पियुष ढाले, गोपाळ रणखाम, चेतन जाटे, अविनाश घाटे व स्वाती काळे यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...