⚡ ब्रेकिंग News

देवगाव धरणामध्ये आढळला,खेड येथील बेपत्ता

देवगाव धरणामध्ये आढळला,खेड येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह
आर्णी:- तालुक्यातील खेड येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा देवगाव येथील धरणामध्ये बुधवार दिनांक २९ मार्च रोजी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील खेड येथील इसम नामे दिनकर देवराव राठोड वय ३७ वर्ष रा.खेड हा रविवार दिनांक २६ मार्च रोजी देवगाव धरणावर मासे पकडायला जातो असे घरी सांगून गेला होता,पण रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला,पण न मिळाल्याने,सोमवार दिनांक २७ मार्च रोजी आर्णी पोलिसांत तक्रार दिली,त्या दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी ३ दिवस त्या इसमाचा शोध घेतला,
शेवटी बुधवारी देवगाव धरणामध्ये त्या बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला, आर्णी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन,मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून,पंचनामा करून,मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविण्यात आला.पुढील तपास आर्णी पोलीस करित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...