⚡ ब्रेकिंग News

महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित पॅनलचा विजय तर मनोहर नाव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पॅनेलचा धुवा उडाला

महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित पॅनलचा विजय तर मनोहर नाव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पॅनेलचा धुवा उडाला
महागाव: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या 18 संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित पॅनलने 11 उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेसला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. सोसायटी मतदारसंघातून सात जागेपैकी सहा जागी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत त्यामध्येगुलाब बाबा जाधव 172 गजेंद्र देशमुख १६६ अंबादास भिमटे 162 करपे यांना 162 वासुदेव नेवाळे १५४ तर किशोर देशमुख यांना 157 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या दोन उमेदवार विनोद जगदेवराव राऊत व अडकिने यांना प्रत्येकी147 मते मिळाली त्यामध्ये ईश्वरचिठ्ठीने विनोद राऊत हे विजयी झाले.ग्रामपंचायत मध्ये रवी रामराव पवार यांना 280 तर उकंडा राठोड यांना 287 मते मिळाली ते दोन्ही उमेदवार विजयी झाले अनुसूचित जाती जमातीमध्ये पुंडलिक भुरके यांना 281 तर संजय केरबा डोंगरे यांना 240 मते मिळाली भुरके विजयी झाले.आर्थिक दुर्बल घटकांमधून परमेश्वर जाधव यांना 279 मते तर सुमनबाई सुभाष यांना २५८ मते मिळाली
परमेश्वर हे विजयी झाले आहेत.महिला राखीव मध्ये सुनंदा पंजाबराव गावंडे यांना 175व पुष्पलता सितारामजी ठाकरे यांना 167 मतदान मिळाले त्या दोन्हीही उमेदवार विजयी झाले असून निर्मला वानखेडे यांना 153 तर कांताबाई राठोड यांना 149 मते मिळाली विमुक्त भटक्या जातीमधून धनगर हे विजय झाले आहेत तर पवार यांना 162 मतदान मिळाले ते पराभूत झालेसंदीप राऊत यांना 170 मतदान मिळाले ते विजय झाले असून विनोद सुरवसे यांना 156 मतदान मिळाल्यामुळे ते पराभूत झाले.
व्यापारी मतदारसंघातून विजयराव कृष्णापुरे महाजन यांना 133 मतदान मिळाले व रितेश मोहनलाल पुरोहित यांना 127 मतदान मिळाले ते विजय झाले असून सुचिता गजेंद्र देशमुख यांना 106 तर सुरेश उत्तमराव नरवाडे यांना 104 मतदान मिळाले तसेच हमाली मतदारसंघात विनोद भगत यांना 145 मतदान मिळाले ते विजय झाले असून विजयी पतंगे यांना 134 मतदान मिळाले ते पराभूत झाले.भाजप प्रणित पॅनल मध्ये प्रामुख्याने दीपक रावजी आडे भाजपा तालुकाध्यक्ष .,पंजाबराव खडकेकर 'सुनील टेमकर योगेश बाजपेयी अमर दळवेमहागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने उमरखेड महागाव विभागाचे आमदार नामदेव ससाने यवतमाळ जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा महागाव येथील गजेंद्र देशमुख वरील बातमी मधील कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...