⚡ ब्रेकिंग News

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील तर उपसभापती परशराम राठोड

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील तर उपसभापती परशराम राठोड
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या मध्ये सभापती म्हणून राजेंद्र पाटील तर उपसभापती परशराम राठोड यांची निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता २३ मे २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती यांची निवडणुक घेण्यात आली. सभापतीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल कडुन राजेंद्र पाटील यांनी तर उध्दव ठाकरे शिवसेना पॅनल कडुन प्रविन शिंदे, तुकाराम आडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. तसेच उपसभापती पदासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल कडुन परशराम राठोड यांनी तर उध्दव ठाकरे शिवसेना पॅनल कडुन रजनी खंदार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नंतर उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे प्रविण शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. नंतर सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. सभापती पदासाठी काॅग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पाटील यांना १८ पैकी११ मते तर उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे तुकाराम आडे यांना ७ मते पडली उपसभापती पदासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे परशराम राठोड यांना१८ पैकी ११ मते तर उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या रजनी खंदार यांना १८ पैकी ७ मते पडली.सभापतीपदासाठी राजेंद्र पाटील यांना जास्त मते पडल्याने ते निवडुन आले तर उपसभापती पदासाठी परशराम राठोड यांना मते जास्त मते पडल्याने ते निवडुन आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया चे काम प्राधिकृत अधिकारी परशराम भोसले, सहाय्यक पिपळखेडे, निवडणूक निरिक्षण उदय तुंडलवार, सहाय्यक निवडणूक निरीक्षक विशाल राठोड यांनी पाहिले.निवडणुक प्रकिया शांततेत पार पडली.
सभापतीपदी राजेंद्र पाटील व उपसभापतीपदी परशराम राठोड व इतर संचालकाची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनिष पाटील, साजीद बेग,हरिश कुडे, अनिल आडे, उमेश कोठारी, राजेश बुटले, दिपक बुटले,उमेश ठाकरे, शितल चौधरी, प्रदिप मसराम, शहागफुर शेख, रविंद्र नालमवार, राजु विरखेडे, आरीज बेग, विलास पाटील, पंडीतराव बुटले, राजु गावंडे, भाऊ इंगोले,नितेश बुटले यांच्यासह आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...