धावत्या दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा,उपचारादरम्यान मृत्यू
आर्णी:-तालुक्यातील आर्णी ते दिग्रस मार्गांवरील काठोडा फाट्या नजीक धावत्या दुचाकीवरून पाठी मागे बसलेली महिला पडल्याने,गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.२६ मे रोजी सकाळी ११:३० वाजता दरम्यान घडली होती.मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.साक्षी सागर शेगर वय २० वर्ष रा.भंडारी असे मृत विवाहितेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,साक्षी व सागर हे शेगर दामपत्य भंडारी वरून आर्णी कडे येत असताना,काठोडा फाट्याजवळ साक्षी अचानक धावत्या दुचाकीवरून खाली पडली.तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने,तिला प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविले होते.रक्तस्त्राव जास्त झाल्याने,ग्रामीण रुग्णालय आर्णी येथून श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान साक्षी चा मृत्यू झाला.शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले असून,शवविच्छेदना नंतर साक्षीचा मृतदेह भंडारी(चिखली) येथे आणण्यात आला.
दोन वर्षा अगोदर च साक्षीचे लग्न झाले होते,तिला ८ महिन्याचा बाळ आहे.साक्षीच्या मृत्यू ने भंडारी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
धावत्या दुचाकीवरून पडल्याने विवाहितेचा,उपचारादरम्यान मृत्यू
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा