⚡ ब्रेकिंग News

पंचायत समिती आर्णी मध्ये सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळा

*पंचायत समिती आर्णी मध्ये सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळा*
(तालुका प्रतिनिधी वीरेंद्र पाईकराव आर्णी दिनांक 31 मे) जिल्हा परिषद सेवेअंतर्गत पंचायत समिती आर्णी येथे सेवा देणारे कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा पंचायत समितीच्या वतीने सेवापूर्तीचा गौरव तथा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. पंचायत समिती आर्णी येथे सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावर कार्यरत असणारे शेषराव मनवर , तसेच प्रभारी गटशिक्षण अधिकारी किशोर रावते तर सिंधुताई नेवारे परिसर पदावरून वयाचे 58 वर्षे पूर्ण झाल्याने 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पंचायत समिती आर्णी मधून बदली द्वारे स्थानांतरण झालेले कर्मचारी यांना सुद्धा निरोप देण्यात आला. मनोज कुमार सुरजुसे ग्रामसेवक यांची बदली पुसद येथे झाली तर शशिकांत गवळी यांची आंतर जिल्हा बदलीने छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शेषराव मनवर यांनी आपला अनुभव व्यक्त करून जिल्हा परिषदेची नोकरी करताना, ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी व समस्या सोडवताना, त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला नकार न देता नियमात बसून त्यांची समस्या कशी सोडवता येईल हे नक्की करावं ,,असे त्यांनी सांगितले, निळकंठ वाघमारे, नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मा.जयश्री वाघमारे यांनी प्रामाणिकपणे सेवा केल्यास निश्चितच कर्मचारी सत्कारास पात्र होतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद इंगोले विस्तार अधिकारी पंचायत यांनी केले. तर कृषी अधिकारी पल्लवी देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विकास गुल्हाने सहाय्यक प्रशासन अधिकारी, प्रमोद माकोडे कनिष्ठ प्रशासना अधिकारी, देवधर ,अरविंद राठोड सहायक लेखा अधिकारी, एम एम भगत विस्तार अधिकारी पंचायत, आशिष इंगोले संगणक विभाग प्रमुख, सुमित डकरे एसबीएम विभाग प्रमुख, प्रियंका माने घरकुल विभाग, अमीर खान नरेगा विभाग, व इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...