दादाराव डोल्हारकरच यवतमाळचे मुख्याधिकारी
उच्च न्यायालयाचा आदेश: बदली नियमानुसारच'मॅट'चा आदेश केला रद्द
जवळा : यवतमाळ येथील नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी राजकीय सुडातून बदली झाल्याचा आरोप करीत बदली आदेशाविरोधात 'मॅट'मध्ये धाव घेतली. तेथे 'मॅट'ने बदली प्रक्रिया रद्द ठरवत जैसे थे स्थिती करावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात विद्यमान मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने मॅटचा आदेश रद्द. ठरवून बदली नियमानुसार असल्याचे स्पष्ट केले.
'मॅट'ने दिलेल्या निर्णयाविरोधात
दादाराव डोल्हारकर यांनी उ न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर व न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली न्यायालयाने मंगळवारी याचा अंतिम निकाल जाहीर केला. या खटल्यात दादाराव डोल्हारकर यांची बाजू अॅड. अश्वीन नाईक व ॲड. तुषार ताथोड यांनी मांडली.
गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी कोण राहणार, याबाबत यवतमाळ शहरात चर्चा सुरू होत्या. न्यायालयाच्या आदेशामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दादाराव डोल्हारकरच यवतमाळचे मुख्याधिकारी
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق