⚡ ब्रेकिंग News

वैष्णवी व भूमिकाने नीट परीक्षेत महागाव तालुक्याचे केले नावलौकिक

वैष्णवी व भूमिकाने नीट परीक्षेत महागाव तालुक्याचे केले नावलौकिक
महागाव तालुक्यातील खेड्यातून व प्रतिकूल परिस्थितीत आजही गावगाडा असणाऱ्या पोखरी तांडा येथील वैष्णवी राठोड हिने नीट परीक्षा २०२३ मध्ये ७२० पैकी ७०० गुणांकन मिळवून बंजारा समाजातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच तालुक्यातील इजणी येथील भूमिका अवधूत पानपट्टे हिने ७२० पैकी ६२८ गुण प्राप्त करुण इतिहास घडविला.
महागाव तालुक्यातील पोखरी (इ.) येथील वैष्णवी रोहीदास राठोड या विद्यार्थिनीने अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑल इंडिया रँकमध्ये तिचा २३० वा क्रमांक आहे तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुपमध्ये ती ४४ क्रमांकावर आहे. तिच्या या यशाने महागाव तालुक्यातील यशाच्या शिखरावर मानाचा तुरा खोवला गेला.
पोखरी या बंजारा बहुल गावाची असलेली ही सावीत्रीची लेक भारत देशात सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. वैष्णवीचे वडील रोहीदास राठोड यांचे २०११ मध्ये मोटारसायकल अपघातात निधन झाले. या धक्क्याने तिचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. परंतु वैष्णवीने जिद्द न सोडता अभ्यासाकडे अधिक लक्ष देत गगन भरारी घेतली आहे. तिच्या या यशाने तिचे व वडिलांसह महागाव तालुक्याचे नाव लौकीक झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...