⚡ ब्रेकिंग News

आईच्या तेरवीचा अनाठायी खर्च टाळून वृद्धाश्रमात केले अन्नदान

आईच्या तेरवीचा अनाठायी खर्च टाळून वृद्धाश्रमात केले अन्नदान
अमोल शिस्तकार ने उभां केला समाजासमोर आदर्श जवळा भगीरथ राजा 24 न्यूज जवळा येथील सौ. प्रभाताई रामराव शिस्तकार याचे आजाराने १४ जुन ला निधन झाले.तेव्हा परंपरेनुसार दहा दिवस आणि तेरवी करतात. मुलगा अमोल याने आईची तेरवी वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान करून करण्याचा प्रस्ताव वडील, भाऊ आणि नातेवाईकांसमोर ठेवला सर्वांनी त्याला होकार देऊन आईची तेरवी आर्णी येथील मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमात २७ जुन ला वृद्धांना अन्नदान करून केली.. परंपरेनुसार मृत्यूनंतर तेरवीचा कार्यक्रम येतो जर आपणं ज्यांना खरोखरचं अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींसाठी भोजनदान दिले तर सत्कर्मी लागेल. आणि आपणं गरजवंतांच्या कामी पडलो याचे समाधान मनाला लाभेल हिचं भावना मनाशी ठेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारा अमोलच्या संकल्पना मनात आली. आणि त्याला वडील रामरावजी शिस्तकार आणि भाऊ पुरुषोत्तम यांनी साथ दिली. आणि समाजभान सामाजिक जाणीव ठेवून वृद्धाश्रमातील लोकांना अन्नदान करून वृद्धाश्रमात धान्य दिले. गरजवंतांना अन्नदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अमोल पेंटिंग काम करून कुटुंबाला आधार देणारा होतकरू तरुण. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून सुद्धा अमोल मनाने, विचाराने श्रीमंत आणि समाधानी व्यक्ती आहे. अमोलने केलेल्या या समाजहिताच्या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...