बोरगाव येथील महिलेच्या खुनातील फरार आरोपीस अखेर पोलिसांनी केले जेरबंद
जवळा: भगीरथ राजा २४ न्यूज सविस्तर वृत्त असे की आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एकटी घरी राहणारी ४० वर्षीय विधवा महिलां नामे सुनिता दत्ता मुधळकर हिचा तिच्या घरातच खून झाल्याची घटना 23 जून रोजी सकाळी उघडकीस आली होती. परंतु सदर घटनेतील आरोपी फरार झाल्याने पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आवाहन होते. आज दिनांक २४ जून रोजी यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली व पोलिसांचे दोन पदके तयार करून आरोपीचा जंगलामध्ये शोध घेण्याचे सुचित केले. यावरून उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार श्याम सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गजानन अजमेरे, सतीश चौदार, शिवराज पवार, यांनी तात्काळ दोन पोलीस पदके जंगलामध्ये तपासाकरिता रवाना केले. पोलिसांना अखेर दाभडी जंगलामध्ये दडून बसलेला महिलेचा मारेकरी सापडला सुनील प्रकाश जाधव वय वर्ष 30 राहणार बोरगाव असे आरोपीचे नाव असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केले असता घडलेली घटना त्यांनी कथीत केली. दिनांक २२ जूनच्या रात्री ११ वाजता मध्य प्राशन टीन पत्रे बाजूला करून महिलेच्या घरामध्ये प्रवेश केला व महिलेला शरीरसुखाची मागणी केली. महिलेने विरोध केला असता दोघांमध्ये हातापायी झाली. यावेळी आरोपीचा राग अनावर झाला व त्याने जवळच असलेल्या चाकूने महिलेच्या छातीवर गळ्यावर वार करून ठार केले असल्याने सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने ४८ तासाच्या आत खुणाचा उलघडा करून आरोपीस अटक केली आहे.
बोरगाव येथील महिलेच्या खुनातील फरार आरोपीस अखेर पोलिसांनी केले जेरबंद
Bhagirath Raja 24 News.com
0

إرسال تعليق