आर्णी पोलीसांचा अवैध दारूभट्टीवर छापा
जवळा:आर्णी तालुक्यातील आसरा ते दाभडी शेतशिवारात आर्णी पोलीसांनी अवैध दारू भट्टीवर छापा टाकून ३७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तालुक्यातील आसरा ते दाभडी पांदन रस्त्याने असलेल्या नाल्यात गावठी दारू काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला असता एक ईसम संतोष धोत्रे (५२) राहणार आसरा हा तेथे दारू काढताना मिळुन आला. घटनास्थळा वरून दारू गाळणे करीता असलेला १५ पिप्यात २२५ लिटर मोहाचा सडवा अंदाजे किंमत २२हजार ५०० रुपये, ४प्लास्टिक कॅन मध्ये १०० लिटर मोहाचा सडवा अंदाजे किंमत दहा हजार रूपये, दारू गाळण्याचा एक स्टील ड्रम अंदाजे किंमत चार हजार रुपये, एका डबकीत ५ लिटर गावठी दारू किंमत ५०० रूपये तसेच बकेट, टोपले, डबकी, पाईप, चाळणी किंमत ५०० रुपये असा एकूण ३७ हजार रुपये किंमतीचा मुध्देमाल पोलीसांनी जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा आदीत्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक दिनेश बैसाने, विनायक कोते, आर्णी चे पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे, पोलीस जमादार सतीश चौधार, अरविंद चेमटे तुषार जाधव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.
आर्णी पोलीसांचा अवैध दारूभट्टीवर छापा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा