महसूल अधिकारी, तलाठी यांच्या कडुन शेतकऱ्यांना ई पिक पेरा भरण्यासाठी शेतावर जाऊन मार्गदर्शन
जवळा (प्रतिनिधी) माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिक पेरा या अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वताच्या शेतातील पिकांची नोंद स्वताच करायची आहे. न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहील व शेतकऱ्यांना शासनाची कोणतेही मदत मिळणार नाही. तसेच पिक विमा, पिक कर्ज,अनुदान प्राप्त होणार नाही. शेतकरी शासनाच्या मदतीपासुन वंचित राहु नये म्हणून महसूल विभागातील अधिकारी, तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी बाबत मार्गदर्शन करीत आहे.
उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे साहेब यांचे मार्गदर्शनात तहसीलदार परशराम भोसले व तलाठी यांनी तालुक्यातील तेंडोळी, उमरी इजारा, येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी याबाबत मार्गदर्शन केले. तेंडोळी येथील शेतकरी विनोद कवडू नगोसे यांना तलाठी ममता पवार यांनी ई पिक पेरा मोबाईल अँपवर कसा भरायचा या बाबतचे मार्गदर्शन व शेतकऱ्याना पिक पेरा भरून दाखविला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना तहसीलदार परशराम भोसले यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की पिक पेरा नोंदवताना अचुक नोंदवा. त्यांनी गावातील सरपंच, सदस्य,पोलिस पाटील, यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील ई पीकपाहणी ॲप द्वारे शंभर टक्के पिक पेरा नोंद करून घ्यावे असे आवाहन केले. पिक पेरा नोंदल्या गेला नाही तर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती परशराम राठोड, तेंडोळीच्या सरपंच सपना राठोड,पोलिस पाटील गंडाईत, कोतवाल सहारे यांच्यासह राजेश माहेश्वरी, श्रीकृष्ण जावळकर ,मनोहर नागोसे, संदीप भजभुजे, शांता नागोस आदी शेतकरी उपस्थित होते.तसेच आर्णी तालुका सुकळी, जवळा, लोणी, कोळवन, मनपुर ,भंडारी, कुऱ्हा, बोरगाव, लोणबेहेळ, व अन्य सर्व गावांमध्ये इपिक पाहणी बाबत सबध्दीत अधिकारी व तलाठी यांच्या कडुन माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी, तलाठी यांच्या कडुन शेतकऱ्यांना ई पिकपेरा भरण्यासाठी शेतावर जाऊन मार्गदर्शन
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق