⚡ ब्रेकिंग News

राष्ट्रीय विश्वगामी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्या चे राळेगाव तहसिलदार साहेब यांना देण्यात आले निवेदन*

*राष्ट्रीय विश्वगामी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्या चे राळेगाव तहसिलदार साहेब यांना देण्यात आले निवेदन*
राळेगाव,(ता.14): आज रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोषजी निकम यांच्या आदेशाने मा. वैभव पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा. रन्तपालजी डोफे, मा. संजय कारवटकर जिल्हा उपाध्यक्ष, विनोद माहुरे रा.वि. तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष, प्रशांत भगत रा.वि. पत्रकार संघांचे तालुका उपाध्यक्ष, सम्यक मैसकर जिल्हाध्यक्ष रा‌.वि. कामगार संघटना, उमेश कांबळे, शशिम कांबळे सचिव, गणेश हिवरकर, सुधाकरराव दांडेकर,यांच्या उपस्थितित राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या व राष्ट्रीय विश्वगामी विंग संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना सर्व पत्रकारांच्या १७ मागण्या असलेले निवेदन राळेगावचे तहसिलदार मा.भोईटे साहेब यांच्या मार्फत देण्यात आले. निर्भिडपणे पत्रकाराकीता करणाऱ्या पत्रकारांनवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्याकडुन भा.दं.वि.कलम ३५३ चा दुरुपयोग करण्यात येते तसेच पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करुन लोकशाहीचा चौथास्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाते
, या कलमाचा धाक दाखवुन निर्भिडपणे पत्रकाराकीता करण्यापासुन रोखले जाते त्यामुळे भादंवि कलम ३५३ मधून पत्रकारांना वगळण्यात यावे व राज्यात काही पत्रकारांना ३५३सारखे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावे, पत्रकार प्रवास करीत असलेल्या वाहनांना राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी मिळावी, तसेच रेल्वे मध्ये पत्रकारांना मोफत प्रवेश मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडुन पाठपूरावा करण्यात यावा, शासनाने ६० वर्ष पुर्ण झाल्यावर सर्व निकष तपासुन जेष्ट पत्रकारांना अधिस्वीकृती दिली होती आता सन्मानाचा लाभ देतांना जाचक अटी टाकुन जेष्ट पत्रकारांना सन्मानाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे
. याबाबत शासनाने लक्ष घालुन जेष्ट पत्रकारांना शासकिय योजनेचा लाभ द्यावा. राज्यात निर्भिडपणे पत्रकाराकीता करनाऱ्या पत्रकारांनवर अवैध व्यावसायिक ,वाळु माफिया, गौण खणिज माफीया,भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व ईतर बेकायदेशीर काम करणार्यां व्यक्तीकडुन अथवा त्यांच्या गावगुंडानकडुन हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोटे गुन्ह्यांमध्ये अडकवुन त्रास दिल्या जातो त्यामुळे निर्भिडपणे पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना संबधित पोलिस ठाण्याकडुन पोलिस संरक्षण मिळावे याकरीता संपुर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे अश्या अनेक मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री साहेब यांना राळेगावचे तहसिलदार मा.भोईटे साहेब यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी चेतन वर्मा, सागर हिकरे,भिमरावजी वागदे,अजय जुमनाके, शंकर पंधरे,देविदास कोल्हे,लक्ष्मन डफरे,गणेश बावणे,व इतर विंगच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...