*समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केले आंदोलन*
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये समान नागरी कायद्याला विरोध करत चरणबद्ध आंदोलनाचा दुसरा टप्पा तालुकास्तरीय धरणे आंदोलन नेर येथे संपन्न झाले. नेर तहसील कार्यालय समोर दुपारी १२:०० वाजता पासून नेर तालुक्यातील राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते व त्याचबरोबर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित झाले होते समान नागरी कायदा हा आदिवासी यांचं अस्तित्व संपुष्टात आणणारा कायदा असून संविधानाने दिलेल्या अनुच्छेद २४४ अनुसूची ५ व ६ चे उलंघन होणार आहे याबरोबरच आदिवासींची संस्कृती संपुष्टात येणार आहे याचबरोबर संविधानाने एस.सी. एस.टी. ओ.बी.सी. हि दिलेली ओळख सुद्धा समाप्त होणार आहे तसेच आरक्षण सुद्धा संपुष्टात येणार आहे व समानतेला मानणारे प्रमुख धर्म जैन, बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, लिंगायत, महानुभाव, या धर्मांना संविधानामध्ये दिलेले धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा संपुष्टात येणार आहे हा कायदा देशाच्याच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाच्या विरोधातला आहे, घटनेतील कलम १४ व २५ प्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य हिरावल्या जाणार आहे, म्हणून समान नागरी कायदा अमलात आणू नये या करिता राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या बरोबरच संपूर्ण बहुजन समाजातील संघटनांनी धरणा आंदोलन केले आहे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा तिसरा टप्पा जिल्हास्तरीय रॅलीच्या माध्यमातून २७ जुलाई तर चरणबद्ध आंदोलनाचा चौथा टप्पा ०७ ऑगस्ट भारत बंदच्या माध्यमातून केला जाणार आहे. या आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता दिनेश कुंमरे, देवराव साठे, चंद्रशेखर पाढेन, चरण पवार, सुरेश मडावी, अरविंद पाटील, राजीव डफाडे, रजा शेख, वासुदेवराव शेंडे, बळवंत खडसे, सतीश काळे, रमेश खडसे, पांडुरंग शेंडे, प्रवीण रंगारी, संजय खोब्रागडे, उदयभान आडे, माणिक चव्हाण, विकी खोब्रागडे, पंकज रंगारी, मनोज लिंगाइत, आकाश चहांदे, अंकुश रामटेके, प्रफुल नेरकर, सय्यद फिरोज, भास्कर तुपटकर, संघमित्रा गायकवाड, प्रीती गवई, कल्पना खोब्रागडे, पद्माबाई अरकड, इत्यादी उपस्थित होते
समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केले आंदोलन*
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा