तिवरंग - तळणी पैनगंगा नदीवरील पुलासाठी तीस कोटी रुपये मंजूर
विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलासाठी महायुती शासनाकडून चालू अधिवेशनामध्ये तीस कोटी रुपये मंजूर मंजूर करण्यात आले .
तीवरंग तळणी कोळी मार्गे मराठवाडयातील नांदेड जाणाऱ्या मार्गावर पुल व्हावा अशी गेल्या दहा वर्षापासून या भागातील लोकांची मगणी होती . दरम्यान हिवाळी अधिवेशनात या पुलाकरिता निधी मंजूर झाला नाही . गेल्या दहा वर्षापासून शासनाकडे याठीकांनी पुल व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती .दरम्यान गत दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या मार्गाचा सर्वे करण्यात येऊन प्रस्ताव शासन दरबारी ठेवण्यात आला होता.गेल्या अधिवेशनात या कामास मंजुरी मिळाली नसल्याने तिवरंग येथील नागरिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला होता व येथील पैनगंगा नदीपात्रात सुभाष रेदासणी ,सातिष जारंडे, नारायण तावडे, मिलिंद लोखंडे ,शिवाजी कदम,श्रीधर धोंगडे ,आनिल कदम, गुलाब धोंगडे यांनी आमरण उपोषण केले होते .दरम्यान या घटनेची दखल घेऊन विद्यमान शासनाकडून चालू अधिवेशनात वानेगाव तीवरंग ता.उमरखेड जि.यवतमाळ या रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे .मराठवाडयातील येहळेगाव तूकाराम संस्थान ते विदर्भातील मुळावा येथील रेणूका देवी संस्थान,तसेच येथील बौद्धविहार येथे येजा करण्यासाठी हा मार्ग अतिषय जवळचा ठरणार आहे .
तसेच येथून जवळच असलेल्या मराठवाड्यातील तळणी हे जेथे प्रसिद्ध आठवडी बाजार भरतो शेतकऱ्यांना आपले माल विकण्या करिता महत्वाचे ठरणार आहे . शासनाने या पुला करिता निधी दिल्याने या भागातील सामाजीक कार्यकर्ते ,शेतकरी, नागरिक यानी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे .
तिवरंग - तळणी पैनगंगा नदीवरील पुलासाठी तीस कोटी रुपये मंजूर
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा