महावीर इंटरनॅशनल द्वारा विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण*

*महावीर इंटरनॅशनल द्वारा विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण*
यवतमाळ :- येथील आबासाहेब पारवेकर महाविद्यालय नागपूर रोड येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नवलेकर सर होते.प्रमुख अतिथी महावीर इंटरनॅशनल यवतमाळ अध्यक्ष प्रविण निमोदिया,सचिव शोभाताई दोडेवार,कोषाध्यक्ष शेखर बंड,शरद नीमोदिया,हर्षल एम्बरवार,उज्वला भाविक होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. नावलेकर यांनी महावीर इंटरनॅशनल च्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. प्रविण निमोदिया यांनी समाजाची गरज ओळखून त्याची पूर्तता करणे या प्रमाणे गेली 15 वर्षे यशस्वीपणे सर्व सदस्यांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे.
या प्रसंगी महेंद्र बोरा, संगिता पिपरीया,प्रा.ललिता घोडे,मनोज अग्रवाल,प्रा.गजानन राहाटे, प्रा.दिनेश जयस्वाल,प्रा.रुपेश कुरेकर,प्रा.संजय तामगाडगे उपस्थित होते.संचालन प्रा.सोहम सामृतवार व आभार प्रदर्शन प्रा.वृषाली मदने यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...