*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न*
आर्णी.
तालुक्यातील जवळा येथील ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशन च्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
दिनांक 26 जुलै 2023 रोजी बुधवारी आयोजित या कार्य शाळे च्या अध्यक्ष स्थानी प्राध्यापक ज्योतिपाल देशपांडे हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून.प्रा. अनीश सोलंकी, प्रा शारुख सोलंकी, प्रा. अल्तामाश शेख, प्रा. गौरव देशमुख, प्रा. महेश काकड़े, प्रा. पल्लवी रामजीरकर, प्रा. अश्विनी शिकारे .यांची
उपस्थिती होती
नवीन शैक्षणिक धोरण त्यापुढील आव्हाने आणि निर्माण होणाऱ्या नवीन संधी या सर्व बाबीवर मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मीनाक्षी गावंडे मॅडम यांनी केले तर या कार्यशाळेमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्व. भारत सिंह ठाकुर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र कोड क्रमांक 14 117 तथा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय सवलग्नित ठाकूर प्रशासकीय महाविद्यालय कोड 11 97 चे विद्यार्थी सहभागी झाले होते .सदर कार्यशाळेवर प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमुळे आमचे अनेक प्रश्न समाधानकारक पद्धतीने सुटले अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे विशेष. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साक्षी काटकर यांनी मांनले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा