*महागाव तालुक्यात पाच गावात शाळेला शिक्षकच नाहीत*
महागाव प्रतिनिधी, निलेश पाटील
महागाव तालुक्यात अनेक शाळेला शिक्षकच नाहीत. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय शिक्षण सत्र सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी संपला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळेला अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय होत आहे.
माहे जून पासून प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभीच विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असते. परंतु महागाव तालुक्यात पाच गावे अशी आहेत, या गावातील शाळेला अद्याप पावेतो शिक्षकच नाहीत . यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासार बेहळ या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत २६ विद्यार्थी आहेत. पेढी येथील उर्दू शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असून २७ विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानार्जन करतात. मौजे थार बुद्रुक येथे पहिली इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत २३ विद्यार्थी आहेत. तर हिवरदरी ह्या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी करिता ३४ विद्यार्थी संख्या आहे . तसेच तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या शिरमाळ या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत ३१ विद्यार्थी संख्या आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षकच नसल्याने या ठिकाणच्या गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे . ग्रामीण भागात गोरगरीब कष्टकऱ्यांचीच मुले शिक्षण घेत असतात . तर धनदांडग्यांची मुलं इतरत्र असणाऱ्या शहरी भागातील नामावंत शाळेकडे त्यांचा शिक्षणाचा कल आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेला शिक्षक आहे किंवा नाही याकडे राजकीय नेते मंडळींना काही एक देणे घेणे राहिलेले दिसत नाही.
महागाव गटशिक्षण विभागात शालेय पोषण आहार अधीक्षक हे पद सध्या रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे दुर्लक्ष होणार आहे यात शंकाच नाही. शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह वेळी भोजन आहार मिळत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्मार होत नसे, परिणामी विद्यार्थी संख्या उपस्थिती वाढ होण्यास मदत होई . महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरिबांचे २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना शिकविण्यासाठी साडेपाचशे शिक्षक असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महागाव पंचायत समिती शिक्षण विभागात केवळ एकच विस्तार अधिकारी शिल्लक आहे. आणि येत्या दोन महिन्यात त्यांची पण निवृत्ती आहे. महागाव तालुक्याची एकंदरीत स्थिती गेल्या अनेक वर्षापासून गंभीर आहे.
या प्रकाराकडे राजकीय
मंडळींना काहीही सोयर सुतक राहीलेले नाही. तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावली आहे, त्यामुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील बरेचसे शिक्षक शिक्षकी पेशा ला बाजू देत विमा पॉलिसी, कन्स्ट्रक्शन सारख्या व्यवसायात लक्ष घालत असून, शासनाकडून मिळणाऱ्या ७०ते ७५ हजाराच्या पगारावर असमाधानी असल्याने त्यांना शिकवणी कार्यात रुची नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे डीएड, बीएड झालेल्या गरजू बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या हाताला काम नाही. महागाव तालुक्यात शून्य शिक्षकी शाळेत शिक्षक भरती होऊन , शिक्षणाचा दर्जा वाढ होण्यासाठी शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे पालक वर्गातून बोलले जाते.
महागाव तालुक्यातील कासार बेहळ, पेढी, थार बुद्रुक, हिवरदरी आणि शिरमाळ या पाच ठिकाणच्या शाळेला सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे गटशिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी गोपाल काटकमवार यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
महागाव तालुक्यात पाच गावात शाळेला शिक्षकच नाहीत*
Bhagirath Raja 24 News.com
0
إرسال تعليق