मा.मंत्री धमकी प्रकरण ;धमकी देणाऱ्याच्याच गावी यशोमती ठाकूर*

*मा.मंत्री धमकी प्रकरण ;धमकी देणाऱ्याच्याच गावी यशोमती ठाकूर*
मुळावा :- माजी मंत्री यशोमती ठाकुर यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी देणारा कैलास सूर्यवंशी यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी येथील असल्याने व धमकी प्रकरण च्या अवघ्या दोनच दिवसात माजी मंत्री यशोमती ठाकूर शेंबाळपिंपरी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दगड़धानोरा येथे पोहचल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या.
३१ जुलै रोजी अमरावती येथील राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली होती आणि यशोमती ठाकुर यांनी याबाबत जीवाचे बरे वाईट झाल्यास राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगताच पोलीसांच्या तपासाची चक्रे गतिमान झाली आणि अवघ्या काही वेळातच धमकी देणारा आरोपी हा शेंबाळपिंपरी येथील असल्याचा सिद्ध झाले .आणि गुरुवार दि.3 जुलै रोजी यशोमती ठाकूर ह्या त्यांचे मामा सहकार क्षेत्राचे नेते आडवोकेट सूर्यकांत देशमुख यांच्या अंत्यविधी साठी शेंबाळपिंपरी लागत दगडधानोरा या गावी आल्या होत्या.माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा शेंबाळपिंपरी येथील असल्याने व यशोमती ठाकूर येथे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या . यावेळी राजकीय मंडळी मध्ये ठाकूर या फार डेरिंग बाज,डॅशिंग नेता असल्याची चर्चा ऐकवयास मिळाली . दुपारी एक च्या सुमारास अंत्यविधी आटपून यशोमती ठाकूर शेंबाळपिंपरी मार्गेच वापस गेल्या .धमकी प्रकरण,त्यात धमकी देणारा सुध्दा परिसरातील त्यात यशोमती ठाकूर येथे हजर असल्याने अंत्य विधी कार्यक्रमावेळी दगड धानोरा या गावाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते.या वेळी आरसीपी चा ताफा, उमरखेड ,पुसद ,खंडाळा व पोफाळी पोलीस चा मोठा बंदोबस्त होता.या वेळी आ.यशोमती ठाकूर सोबत मा.वरपूडकर,माजी आमदार विजय खडसे ,प्रदेश सचिव डॉ मो नदीम, ऍड. आशिष भाऊ देशमुख,शिवाजीराव देशमुख सवनेकर,पुसद म.बँकेचे अध्यक्ष अंकुश चव्हाण ,तातू देशमुख,
सैय्यद इश्तियाक ,सदबाराव मोहटे,कैलास फुके ,ऍड.आशिष देशमुख ,सरपंच महल्ले,सय्यद अतिकोद्दीन,ऍड गजानन देशमुख,जैनुल सिद्दीकी , इम्रान पठान, सय्यद जानी,निशांतजी बयास, ज़िया शेख, सय्यद हकीमोद्दीन मा. बीजी राठोड,मा.प्रकाशराव देशमुख यासह परिसराचे प्रमुख व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...