धनज व मरसूळ येथे डोळ्यांच्या साथीबाबत आरोग्य शिबीर*

*धनज व मरसूळ येथे डोळ्यांच्या साथीबाबत आरोग्य शिबीर*
मुळावा (वा) जि प उ प्रा शाळा धनज व अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा मरसूळ येथे सध्या सर्वत्र पसरलेला डोळे येणे संसर्गजन्य रोग, मुलांमध्ये ज्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणातआहे याबाबत आरोग्यविभागाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले.आरोग्य तपासणी करिता आरोग्य विभागाचे डॉ. विशाल दवणे (वैद्यकीय अधिकारी मुळावा), डॉ. वानखेडे, किशोर एडके , रीना कोंडुरकर उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. विद्यार्थ्यांना डोळे आल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, डोळे येऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यावी, हात कसे धुवावे,स्वच्छता
कशी राखावी,टीव्ही पाहण्यामुळे डोळ्यावरील दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सदर शिबिरात धनज येथे वनिता पाचपुते (सरपंच) मुक्ता झाडे(उपसरपंच),चरन डोंगरे ,गौतम ढोबळे,देवानंद पाचपुते तसेच धनज व मरसूळ येथे तेथील आशा वर्कर शाळेतील शिक्षकवृंद,धनज व मरसूळ येथील मान्यवर,गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...