महिला धडकल्या 'उमरखेड ' ठाण्यावर !

महिला धडकल्या 'उमरखेड ' ठाण्यावर ! बिटरगाव (खु) येथील अवैध दारू बंद करा !
उमरखेड : तालुक्यातील मौजे बिटरगाव ( खु ) येथील अवैध दारू विक्री बंद करणेबाबत व अवैध धंदे व दारु विक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्यासाठी आज दिनांक ७ रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाअध्यक्ष सरोज देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी महिला उमरखेड पोलिस ठाण्यात धडकुन अवैध दारू विक्रेत्यावर व अवैध धंदे चालविणार्‍यावर पायबंद घालावा अशी मागणी निवेदन देवुन केली आहे . बिटरगाव ( खु ) येथे मागील अनेक दिवसापासून अवैध दारू विक्रेता हा राजरोसपणे दारु विकी करीत आहे . यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . दारु गावातच मिळत असल्याने लहान वयातच मुले दारुच्या आहरी जात आहेत . दारु पिणारे आणि दारू विक्रेते हे महिलांना जाता येता अश्लिल शिविगाळ करित आहेत . शाळकरी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे . या प्रकारामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री व गावातील अवैध धंदे समुळ नष्ट करून कडक कार्यवाही करावी अन्यथा जिजाऊ ब्रिगेड कडून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून यवतमाळ जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख यांनी दिला आहे यावेळी बिटरगाव ( खु ) येथील प्रतिभा नरवाडे, कलावती नरवाडे, संजीवनी लव्हांडे , सिमा चव्हाण, ज्योती लव्हांडे , अर्चना नरवाडे , वनिता लव्हांडे , रुखमीना नरवाडे , प्रणीता नरवाडे , मिना नरवाडे , विमल सुरोशे , लक्ष्मीबाई नरवाडे , मिना चव्हाण , दिपाली लव्हांडे या महिलासह शेकडो महिला उपस्थित होत्या .
" चौकट " दारु विक्रेत्यावर कार्यवाही करावी यासाठी निवेदन देतांना महिलांनी दारू विक्रेत्याचे नावासहीत निवेदन ठाणेदार शंकर पांचाळ यांना दिले आहे त्यामुळे काय कार्यवाही होते ह्याकडे लक्ष लागले आहे .
॥चौकट ॥ या प्रकरणी बिटरगाव (खु) येथील अवैध दारू विक्रेत्याच्या नावासहीत निवेदन देवून कार्यवाहीची मागणी केली आहे. या संदर्भात ठाणेदार शंकर पांचाळ यांना कार्यवाही करणार का विचारले असता ॥ मी बिझी आहे ' नंतर बोलूत म्हणून टाळाटाळ केली आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...