जिल्हा बँकेच्या निवडणूकीत महायुतीचे पानिपत, अध्यक्ष पदी काँग्रेसचे पाटिल विजयी.
▪️मनिष पाटिल यांना १५ तर प्रतिस्पर्धी राजुदास जाधव यांना ६ मते
यवतमाळ/
जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी संचालकांनी चांगलीच कंबर कसली होती. परंतु आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मनीष पाटलांनी २१ पैकी १५ मते घेत अध्यक्षपद महाविकास आघाडी कडे खेचून आणले. तर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना (शिंदे गटाच्या) राजुदास जाधव यांचा ९ मतांनी दारुण पराभव केला. यामुळे बँकेवर पुन्हा एकदा महविकास आघाडीचा झेंडा निर्विवादपणें फडकला.
आज दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झालेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचे मनीष उत्तमराव पाटील यांचा १५ विरूद्ध ६ मतांनी दणदणीत विजय झाला. मनीष पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते व त्यांच्या विरोधात संचालक राजुदास जाधव यांना युतीकडून उमेदवारी देण्यात आली होती. जाधव यांच्या समर्थनात शिवसेना (शिन्दे गट), भाजपा, राष्ट्रवादी (अजीत पवार गट) हे पक्ष होतें. याआधी काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना मिळून बँकेत सत्ता होती. काँग्रेसकडे ९ संचालक म्हणजे बहुमत असल्याने अध्यक्षपद काँग्रेस कडे देण्यात आले होते. तर सेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक उपाध्यक्ष व स्वीकृत संचालक पद देण्यात आले होते. माञ राज्यांतील सत्तांतराचे पडसाद जिल्हा बँकेत उमटले तरी सुद्धा स्वीकृत संचालक पद देण्याचा शब्द महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाळला. यादरम्यान भाजपची भुमिका तटस्थ राहिली व त्या भूमिके वर ते ठाम राहिले. परंतु महाविकास आघाडीतील संचालकांनी आपला शब्द पाळला नाही या कारणास्तव आज झालेले निवडणुकीत राजुदास जाधव यांचा रूपाने अध्यक्ष पदाच्या निवडणुकित आपला उमेदवार रिंगणात उतरविला.
जिल्ह्यातील बहुतांश आमदार व पालकमंत्री सत्तापक्षांचे असल्याने साम-दाम-दंड-भेद याचा वापर करत. राजूदास जाधव यांना विजयी करण्यासाठी भाजप सह मित्र पक्षांनी चंग बांधला होता. याचबरोबर जाधव यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी संचालकांना विविध प्रकारचे आमिषे देण्यात आली. तर जे संचालक आमिषांना बळी पडले नाही त्यांना विविध प्रकारच्या भीती निर्माण करण्यात जसे की भरती प्रक्रिया, कर्ज प्रकरणे होऊ देणार नाहीं अशा भीती निर्माण केल्या होत्या. मात्र सत्तेचा गैरवापर करून बँकेत सत्ता आणणाऱ्या पक्षांच्या अमिषांना व भीतीने बळी न पडता महाविकास आघाडीतील सर्वच संचालकांनी आणि एक संध राहुन आपल्या उमेदवाराला मतदान केले तर अपक्षांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना(उबाठा) चे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान माहविकास आघाडीला बहुमत सिद्ध होत मनिष पाटिल बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांचा राजीनामा घेण्यासाठी माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी हा राजीनामा घेतला होता. आज श्रीमती धानोरकर पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या असून अध्यक्षपदी काँग्रेसचा संचालक बसविण्यास त्यांची भुमिका महत्वाची ठरली. माजी मंत्री मोघे यांनी पालकमंत्री संजय राठोड पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सुरु राहण्यास वारंवार बोलणी केली परंतु राठोड व नाईक यांनी वेगळाच सुर घेतल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लागली.
या निवडणुकीत संपूर्ण काँग्रेस पक्ष एकसंघ राहीली. माजी प्रदेश अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे तेलंगणा राज्याच्या निवडणुकीत अत्यंत व्यस्त असतांना सुध्दा त्यांनी निवडणुकीवर पुर्ण नजर ठेवली व शेवटचे दोन दिवस यवतमाळमध्येच ठाण मांडुन बसले. मनीष पाटील हे अँड . शिवाजीराव मोघे यांच्या विधानसभा मतदारसंघातून आहेत व त्यांच्या परिवाराशी जवळीक आहे. मोघे यांनी स्वतः पूर्ण वेळ लक्ष देत या निवणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावून, विजयश्री खेचून आणला. माजी आमदार वामनराव कासावार, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, बाळासाहेब मांगुळकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, राजेंद्र गायकवाड शिवसेना संपर्क प्रमुख ( ठाकरे गट) वर्षाताई निकम जिल्हाअध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदपवार गट) यांनी संपूर्ण प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेतला. प्रफुल्ल मानकर जिल्हा अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,प्रविण देशमुख संचालक,पणन महासंघ, मुंबई यांच्या नेतृत्वात व यांच्या राजकिय कौशल्याने कठीण दिसणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती यश मिळवले. यानिवडणुक प्रक्रियेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार गट) शिवसेना ( उबाठा) पक्षाच्या नेते - कार्यकर्ते व अपक्ष संचालकांचे नवनियुक्त अध्यक्ष मनिष उत्तमराव पाटिल यांनी आभार मानले..
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत महायुतीचे पानिपत, अध्यक्ष पदी काँग्रेसचे पाटिल विजयी.
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा