*जवळा येथील ओम बाल गणेश मंडळाचा पोलीस स्टेशन आर्णी येथे सत्कार*
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
आर्णी तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जवळा गावात पोलीस स्टेशन आर्णी येथील ठाणेदार केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात जवळा ओपीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे यांनी जवळा बीट अंतर्गत येणारे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन गणेश उत्सवा मध्ये जे गणेश मंडळ रितसर परवाणगी घेवुन तसेच लाउडस्पीकरचा वापर न करता मिरवणुक काढुन सुर्य डुबायाच्या आत मिरवणुक संपवेन अशा मंडळांना मी पोलीस स्टेशन आर्णी च्या वतीने प्रोत्साहन पर भेट देवुन त्यांचा सत्कार करणार असे आवाहन केले होते. त्यानंतर मोजा जवळा येथिल ओम बाल गणेश मंडळ या मंडळाने दि.29/09/2023 रोजी जवळा गावामध्ये भजनी मंडळ व टाळांच्या गजरात मिरवणुक काढली व सुर्य डुबायच्या आत सात वाजताच्या आधी शांततेत मिरवणुक संपवली. ओम बाल गणेश मंडळ जवळाचे अध्यक्ष गजानन पारधी यांनी सदर गणेश उत्सव अशाप्रकारे साजरा करण्यासाठी आपले मंडळातील सहकारी यांना जवळा ओपीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे तसेच ठाणेदार केशव ठाकरे यांनी प्रोत्साहीत केल्याने व योग्य मार्गदर्शन करून त्याचे फायदे समजावून सांगितल्याने सर्वांनी अध्यक्षाचा निर्णय मान्य केल्याने हे घडु शकले असे अध्यक्षाचे सांगणे आहे. आदर्श गणेश उत्सव साजरा करण्याच्या ओम बाल गणेश मंडळ जवळा यांच्या कार्याची नोंद जवळा बीट प्रभारी काळुसे यांनी ठाणेदार केशव ठाकरे यांना गणेश मंडळाच्या कार्याचा अहवाल सादर केल्याने दि.14/10/2023 रोजी जवळा ओ.पी चे इंन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे, बीट जमादार अरून चव्हाण, प्रदीप खडके,पोलीस काँन्स्टेबल सुधिर कांबळे यांना सांगुन ओम बाल गणेश मंडळ जवळा चे अध्यक्ष गजानन पारधी, उपाध्यक्ष विक्की वडकर, सचिव सुनिल टेकाम,सदस्य आनंदा वैद्य, शंकर मेटकर,विलास शेंडे,विठ्ठल जिरे दिनेश जाधव, आकाश इंगळे,अविनाश जाधव, गोपाळ जाधव यांना पोलीस स्टेशन आर्णी येथे बोलावुन वरील ओम बाल गणेश मंडळ जवळा चे अध्यक्ष सदस्य यांचा शाल श्रीफळ व मिठाई देऊन सत्कार केला व अशाच प्रकारे कोणालाही लाउडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषनाचा त्रास न होता व धार्मीक पावित्र्याला कोणत्याही प्रकारची बाधा न पोहचता सन उत्सव साजरे केल्यास समाजात परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. ओम बाल गणेश मंडळ जवळा यांनी केलेले काम कौतुक्त्पद आहे यांचा आदर्श घेत सर्व दुर्गा/शारदा उत्सव मंडळांनी अशाचप्रकारे नवरात्र उत्सव लाउडस्पीकर (डि.जे) न लावता पारंपारीक वाद्यांचा वापर करून साजरा करावा आम्ही त्यांचाही सत्कार करू असे आवाहन ठाणेदार केशव ठाकरे यांनी सर्व दुर्गा शारदा मंडळांना केले.
जवळा येथील ओम बाल गणेश मंडळाचा पोलीस स्टेशन आर्णी येथे सत्कार*
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा