नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखा;ठाणेदार केशव ठाकरे

नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखा;ठाणेदार केशव ठाकरे
सण, उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून धुमधडाक्यात नवरात्रोत्सवात साजरा करा.पण दुर्गोत्सव साजरा करतांना कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे दुर्गोत्सव मंडळाना भेटी दरम्यान दिला.
बोरगाव येथील शिवनेरी दुर्गोत्सव मंडळाची घटस्थापना गेल्य वीस वर्षापासून ठाणेदारांच्या हस्ते केली जाते.यावर्षीही ठाणेदारांना घटस्थापना आणि पहिल्या आरतीचा मान शिवनेरी दुर्गोत्सव मंडळाकडून मिळाला.त्या दरम्यान दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाणेदार ठाकरे बोलत होते.ते बोलतांना पुढे म्हणाले की,गणपती विसर्जन दरम्यान डीजेच्या तालावर नाचतांना कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविल्याने रक्तदाब वाढून दोघांचा मृत्यू झाला तर लेझर लाईट मुळे अनेकांना अंधत्व आले.त्यामुळे आपल्या चुकीमुळे कोणाचा जीव जाऊ नये याची उत्सव साजरा करतांना काळजी घेऊन नवरात्रो साजरा करा असे आवाहन यावेळी आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
चौकट दुर्गोत्सव मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखा दुर्गोत्सव मिरवणूकीला गालबोट लागुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रकार टाळा.एकोप्याने दुर्गोत्सव साजरा करा.दुर्गोत्सव दरम्यान कोणी कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा किंवा बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करून कायमाची त्याला अदल घडविण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे.
चौकट 'नशामुक्त पहाट अभियानात सहभागी व्हा' नवरात्रोत्सवात दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये साठी सर्व दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा.विशेष म्हणजे पोलीस अधिक्षक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नशामुक्त पहाट अभियान राबविली जात आहे.व्यसनात अडकलेल्या युवकांना यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृती मोहिम राबविली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...